Monday, January 11, 2010

सोमवार :(

जाम थकलोय, सकाळपासून नुसती धावपळ चालली होती. एक तर आज सोमवार, त्यात सकाळी सकाळी meeting पण. कसातरी पोहोचलो वेळेवर, नंतर दिवस भर ह्या ना त्या कारणे पळापळ. संध्याकाळी घरी आलो, संध्याकाळ कसली चांगली रात्र झाली होती. झटपट काही तरी स्वयंपाक करून जेवण केले. त्यानंतर घर आवरायचे हाती घेतले तर इतका कचरा निघाला की तो काढता काढता नाकी नऊ आले. पण एक अर्थी बरे झाले एक काम उरकले.

कसला status दिल्यासारखा post लिहितोय ना मी !!! काहीतरी वेगळे लिहायचा विचार करतोय. कविता वैगेरे आपल्याला जमणे ह्या जन्मात तर शक्य नाहीये त्यामुळे घाबरू नका. पण fictional काहीतरी लिहायला काय हरकत आहे, स्टोरी किंवा एखादी घटना किंवा एखादा संवाद. त्यासाठी आधी एखादी interesting situation सुचली पाहिजे. त्यात पात्र भरावी लागतील, त्यांचे संवाद बांधावे लागतील. बऱ्याच गोष्टी आहेत राव. ही लेखक मंडळी खरंच त्यांचे साहित्य अक्षरक्ष: जगत असतील, नाही? don असतात हे public.

असो, आज पुरते एव्हडेच पुरे. सटकतो-वटकतो आता, बराच वेळ झालाय. Good Night.

2 comments:

Rahul said...

tu barech lihayala laglay... I didn't noticed it :(

keep writing :)

Poonam said...

Diary lihilyasarkha vattay :)
keep it up :)