Sunday, January 10, 2010

मराठी post!!!

          बरीच दिवसाची इच्छा होती काही तरी मराठी मधे लिहायची. पण आमच्या सारख्यानचा मूळ problem म्हणजे काही सुचले तर पाहिजे. त्यात काही अती-सुंदर blogs वाचायला मिळाले की अजून विचार पडतो. साले इतके छान कसे लिहू शकता राव हे पब्लिक, यांना सुचते कसे असे लिहायला. त्यांची वाक्य रचना, व्याकरण, विषयाची मांडणी, सगळे कसे एकदम perfect असते. जे काही म्हणणे आहे ते अचूक रित्या शब्दबद्ध केलेले असतात. कसे???

ह्या २-३ lines लिहायला सुद्धा मला अर्धा तास लागला रे आणि त्यात ही हजार चुका असणार. शाळेत शुद्धलेखण नीट केले असते तर हा problem आला नसता ना !! असो, रात्रीच्या ३ वाजता type केल्यावर असेही तुम्ही काय expect करता आहात.

तर, अर्ध्या जगाला गुड डे आणि अर्ध्या जगाला गुड नाईट.

कळावे,
लोभ असावा.
-विनित

No comments: