Sunday, January 10, 2010

Weekend

         
संपला अजून एक weekend. कसा गेला कळलेच नाही. काल रात्री मस्त ३ पर्यंत गप्पा, त्या मुळे १२ ला जाग येणे साहजिकच होते. आणि ४ ला तर सूर्य मावळतीला येतो इकडे, so इन-मीन ३-४ तासांचा दिवस असल्यासारखे वाटतेय. मरणाची थंडी आहे, कपड्यांचे ४ थर चढवल्याशिवाय बाहेर पडणेच नाही. तरीही हौस म्हणून जवळच्या एका beach वर गेलो पण थंडी मुळे काही मिनिटात परत गाडी मधे परतावे लागले. चौफेर झाडीच झाडी, स्वच्छ आकाश, स्वच्छ मोकळे रस्ते, अती-भव्य malls, तुरळकच दिसणारी पण वेगळ्या वेगळ्या प्रकारची वेगळी वेगळी माणसे, सगळे कसे एकदम वेगळेच जग आहे हे!!! त्यांचे दर २ शब्दांनंतर sorry किंवा thank you म्हणणे पण थोडे विचित्र वाटते, काय हे किती formality !!!

पण इकडे भारतीयांची संख्या पण विलक्षण आहे, especially गुजराथी त्यातल्या त्यात पटेल. इथे एके ठिकाणी तर फक्त इंडिअन shops आहेत. रसोई, सर्वांन्न अशी हॉटेल्सची नावे आहेत. सब्जी मंडी मधे आम्ही १५ दिवसांचा किराणा, भाजी-पाला खरेदी केला. Reliance Big Cinema मधे ३ idiots पाहिला.

असो, आज एकाचे सामान shift करायला मदत केली त्यामुळे थोडा दमल्यासारखे वाटतेय. उद्या लवकर उठायचे आहे, वीक सुरु होईल, भरपूर काम आहे.

bbye :)

No comments: